माणूस म्हणून जन्माला येणे आणि भारताचे नागरिक असणे असा दुर्मिळ योग आपल्याला आला आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून भारताचा नावलौकीक आहे.
मात्र 125 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशाला अनेक संकटांनी ग्रासले आहे.
या समस्या सोडविण्यासाठी मोठ्यांबरोबरच तरुणांनी विशेष पुढाकार घ्यायला हवा.
भारत देशातील तरुणवर्ग पेटून उठल्यास क्रांतीची ती सुरुवात असेल... भारत महासत्ता होण्याची ती वाटचाल असेल.
राष्ट्रहित, राष्ट्रनिष्ठा हाच आपला श्वास असायला हवा.
देशाच्या समस्येपासून दुर जाणे म्हणजे राष्ट्रहित टाळणे होय.
मी आणि माझे राष्ट्र असा ध्यास मनात ठेवायला हवा.
देश आमच्यासाठी काय करतो ? यापेक्षा आपण देशासाठी काय करतो ? याचे भान ठेवायला हवे.
मी एकटा काय करु शकतो ? अशी भिती बाळगणे व्यर्थ होय.
इतिहास साक्षी आहे, प्रत्येक महापुरुषाने, देशभक्ताने देशासाठी योगदान देताना त्यागाची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे.
राष्ट्रहित न कळण्याइतके आपण अगदीच दगडाचे काळीज घेऊन जन्माला आलो आहोत का ?
देश गुलामगिरीत असतानाच आपली एकजूट दिसणार का ?
राष्ट्रावर संकट आल्यावरच आपण पेटून उठणार का ?
की, पेटून उठण्याची आपली वृत्तीच लोप पावली आहे ?
सर्व बाजूंनी देश लुटला जात असताना आता स्वस्थ असणे शक्य नाही.
'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.
'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.
26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.
सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे