भारत देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. आजवर देशावर अनेक संकटे आली. अनेकदा नैसर्गिक आपत्ती देखील आल्या. सर्व संकटे पचवून देश आजही दिमाखात उभा आहे.
जनतेच्या हाती सत्ता येऊन जनता सार्वभौम झाली. दुदैवाने जनता मात्र स्वकेंद्रीत झाली. देशासाठी असलेले आपले कर्तव्य विसरु लागली. राजकीय पक्षांनी या संधीचा आपल्या राजकीय विस्तारासाठी फायदा घेतला.
याचबरोबर धर्मभेद, जातीभेद वापरुन इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या वृत्तीप्रमाणे आपला स्वार्थ साधला. सत्ता मिळविणे व मिळालेली सत्ता टिकविणे याचसाठी राजकीय पक्ष झगडू लागले.
'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.
26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.
सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे