देशाला स्वातंत्र्य मिळून 66 वर्षे झाली. प्रजासत्ताकाची स्थापना होऊनही सामान्य माणूस समस्यांच्या विळख्यातच आहे. अनेक वर्षांपासून त्याच त्याच समस्या कमी न होता उलट वाढताना दिसतात. या समस्या सोडविण्यासाठी शासन, प्रशासन, जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी उपलब्ध आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना मान, मानधन, घर, गाडी, प्रवास, आरोग्य, निवृत्ती वेतन व इतर अनेक सुविधा मिळतात.
मोठी ताकद असूनही शासन व प्रशासन हे जनतेचे कार्य करण्यात कमी पडताना दिसतात. तर दुसरीकडे स्वत:चे आयुष्य पणाला लावून, सर्वस्वाचा त्याग करुन, मातीत गाडून घेणारे सेवाभावी लोक कोणत्याही मोबदल्याविना अहोरात्र सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कार्य करतात. अशा अनेक सेवाभावी व्यक्तींनी समाजाच्या मदतीने मोठमोठ्या समस्यांवर यशस्वीपणे कार्य केले आहे. मात्र शासनाची व्यवस्था असूनही पर्यायी समांतर व्यवस्था उभी करणे सेवाभावी कार्यकर्त्यांना अशक्य आहे.
ज्या विकासात्मक कामांसाठी शासन, प्रशासन, जनप्रतिनिधी आहेत त्या कामांसाठी स्वतंत्रपणे स्वयंसेवी संस्थांना देखील काम करावे लागत आहे. जनतेच्या करातूनच सरकारची विकासकामे चालतात. तरी देखील सामान्य जनता मात्र विकासापासून दूरच आहे. सामाजिक समस्यांचा मुळापासून विचार होणे गरजेचे आहे. शासन मात्र ही भूमिका बजावताना दिसत नाही. वीज, पाणी, रस्ता, रोजगार, शिक्षण, कृषी, आरोग्य, गृहनिर्माण, संरक्षण, महिला अत्याचार, बालमृत्यु, स्त्रीभ्रुणहत्या, कुपोषण, अशा सर्व क्षेत्रांसाठी सरकारचे वार्षिक बजेट तसेच प्रशासन असूनही इच्छाशक्तीचा अभाव असल्याने समाजातील समस्या आजही वाढतच आहेत.
विकासाच्या कामाची गती वाढविण्यासाठी समविचारी लोकांचे ‘संघटन’ करणे असा करणे असा पर्याय पुढे आला. यासाठी प्रजासत्ताक भारत हे संघटन उभे राहत आहे. समाजाचे वैचारिक प्रबोधन होण्यासाठी संघटनात्मक ताकद वाढविणे गरजेचे आहे. राजकीय शुध्दीकरणाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याच पटलावर उभे राहावे लागणार आहे.
‘प्रजासत्ताक भारत’ स्थापनेच्या निमित्ताने संघटन वाढविणे व राजकीय विचारांचे प्रबोधन करणे हाच खरा हेतू आहे. अभिनव पध्दतीने राजकारणाचे शुध्दीकरण व्हावे यासाठीचा विचारमंच म्हणजेच ‘प्रजासत्ताक भारत’ असेल. सेवाभावी वृत्तीच्या लोकांना समाजशील कार्य करण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ असेल.
'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.
26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.
सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे