• देशातील समस्या सुटतील काय ?
उत्तर: देशावर प्रेम करणारे नागरिक एकत्र आल्यास अशक्य काहीच नाही. ‘‘देश वाचवायचा आहे’’ या हेतुने एकत्र आलेले देशभक्तच ‘‘भारत’’ देशाला जगात एक प्रभावशाली राष्ट्र म्हणून पुढे आणतील.
• मी एकटा काय करु शकतो ?
उत्तर: इतिहास साक्षी आहे, प्रत्येक महापुरुषाने देशासाठी योगदान देताना त्यागाची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे. ‘‘माझ्यापासूनच करील सुरुवात... मीच बदलेल माझा देश’’
ही वृत्ती अंगी बाळगल्यास सर्व शक्य आहे.
• रोजच्या कामातून, कुटुंबातून देशसेवा करायला वेळ कुठे मिळतो ?
उत्तर: ज्या पवित्र भारतभूमीत राहुन हवा, पाणी, अन्न, निवारा, सुखसोई भोगायच्या त्या देशाच्या सेवेकरिता वेळ मिळत नाही हा निव्वळ ढोंगीपणा असावा. आपण आपल्या वेळेतील एक टक्का वेळ देशासाठी देऊ शकत नाही ?
व्यापक दृष्टीकोन ठेवा.. राष्ट्रालाच कुटुंब माना.
'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.
26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.
सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे